Surprise Me!

परभणी रेल्वेस्थानकातील प्रतिक्षालयाला आग, अर्ध्या तासात आग अटोक्यात

2019-12-05 281 Dailymotion

परभणी- <br />येथील रेल्वे स्थानकावरील प्रतिक्षालयातील मागील बाजूस आज(गुरूवार) सायंकाळी पाचच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीने मोठा गोंधळ उडाला प्रवाशांना तातडीने बाहेर काढण्यात आल्यामुळे मोठी हानी टळली या आगीत फारसे नुकसान झाले नसले तरी प्रतिक्षालय कक्षासह आजूबाजूस क्षती पोचली आहे <br />रेल्वे स्थानकावरील जुन्या इमारतीत प्रतिक्षालय आहे या प्रतिक्षालयाच्या मागील बाजूस अडगळीत काही सामान ठेवलेले आहे यात प्रामुख्याने स्वच्छतेसाठी लागणारे विविध प्रकारचे लिक्वीड, प्लास्टीकची बकिटे, झाडू, पोछे यासह अन्य साहित्यांचा समावेश होता याच भागातून सायंकाळी पाचच्या सुमारास धूर येत असल्याचे काही प्रवाशांच्या निदर्शनास आले त्यांनी तातडीने अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती दिली, परिणामी मोठी हानी टळली

Buy Now on CodeCanyon