Surprise Me!

शिवसेनेने घटनाबाह्य काम केल्यास आम्ही सरकारमधून बाहेर पडू - अशोक चव्हाण

2020-01-27 283 Dailymotion

नांदेड -संविधानाच्या चौकटीत राहून हे सरकार चालले पाहिजे, हे शिवसेनेकडून लिहून घ्या, असे सोनिया गांधींनी सत्ता स्थापनेच्या वेळी सांगितले होते, असे काँग्रेस नेते अशोक चव्हाण म्हणाले नांदेडमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अशोक चव्हाण बोलत होते <br /> <br /> <br /> <br />अशोक चव्हाण म्हणाले की, "तीन पक्षाचे सरकार म्हणजे मल्टिस्टारर सिनेमा सुदैवाने आमचा सिनेमा सध्या बरा चालला आहे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस असो किंवा उद्धव ठाकरे, कुणालाही वाटलं नाही की आम्ही एकत्र येऊ पण हल्ली मल्टिस्टारर सिनेमाचा जमाना आहे सिनेमात तीन-तीन हिरो पाहिजेत"

Buy Now on CodeCanyon