Surprise Me!

पंचायत समिती सभापती पदी सुनीता दौंड गोकुळ दौंड यांची पेढेतुला

2020-03-15 4 Dailymotion

पाथर्डी पंचायत समितीच्या सभापती पदी सुनीता गोकुळ दौंड यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे पती भारतीय जनता पार्टीचे तालुका उपाध्यक्ष गोकुळ दौंड यांची मोहटा येथे पेढेतुला करण्यात आली. युवानेते अर्जुन धयातड्क यांच्या वाढदिवसानिमित्ताने हि पेढेतुला करण्यात आली. यावेळी दौंड यांचा सत्कार करण्यात आला तर धयातड्क यांचा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न झाला . यावेळी परिसरातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गहिनाथ शिरसाट,युवानेते रणजित बेळगे ,अजिनाथ खेडकर ,मोहन दहिफळे,बाळासाहेब घुले,सचिन आव्हाड,आदी उपस्थित होते. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गहिनाथ शिरसाट यांनी गोकुळ दौंड व अर्जुन धयातड्क यांना शुभेच्छा दिल्या . पेढेतुल्या केल्याबद्दल मोहटा गाव आणि गड परिसरातील नागरिकांचे गोकुळ दौंड यांनी आभार मानले . श्री क्षेत्र मोहटादेवी येथे दौंड यांच्यासाठी येथील त्यांच्या मित्र परिवारांनी मोहटादेवी मातेला नवस बोला होता तो पूर्ण झाल्याबाबद्दल हि पेढी तुला करण्यात आल्याची माहिती यावेळी अर्जुन धयातड्क यांनी यावेळी दिली .दत्तू दहिफळे , महादेव दहिफळे ,गणेश धायतड्क ,अंबादास बटुळे ,नवनाथ चिंतामणी ,अंबादास डोंगरे आदी उपस्थित होते .

Buy Now on CodeCanyon