Surprise Me!

तुकाराम मुंढे स्मार्ट सिटीचे संचालक नाही मग सीईओ कसे? | संदीप जोशींनी केला भांडाफोड | वजीर ऑनलाईन

2020-07-10 1 Dailymotion

नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडची बैठक १० जुलैला आयोजित करण्यात आली आहे, या बैठकीच्या अजेंडामध्ये मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांची संचालकपदी नियुक्ती करण्यासंदर्भात चर्चा, असा विषय आहे. या विषयानेच मनपा आयुक्तांनी केलेल्या खोटारडेपणाचा भंडाफोड झाला आहे, असे सांगत ते स्मार्ट सिटीचे संचालकही नाही, मग सीईओ झालेच कसे, असा प्रश्न महापौर संदीप जोशी यांनी पत्रपरिषदेच्या माध्यमातून मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांना विचारला आहे. <br /><br />मनपा आयुक्त तुकाराम मुंढे हे एनएसएससीडीसीएलचे सीईओ नाहीत. असे असताना त्यांनी कर्मचाऱ्यांना काढले. संचालक मंडळाच्या निर्णयांना धाब्यावर बसविले. सीईओ नसतानाही स्वत:ची सही घुसवून बँकेची दिशाभूल करीत एका कंपनीला २० कोटींचे पेमेंट केले, असा आरोप महापौर संदीप जोशी यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. लवकरच हे सर्व कायदेशीर करण्यासाठी संचालक मंडळाची बैठक बोलाविण्यात येईल आणि त्यात काही विषय मुद्दाम आणण्यात येतील, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली होती.

Buy Now on CodeCanyon