Surprise Me!

बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने लावला नायगावमध्ये पिंजरा !

2020-08-12 0 Dailymotion

नमस्कार जामखेड टाईम्सच्या बातमीपत्रात आपले स्वागत

पाहुयात आज दिवसभरातील दुसरी मोठी बातमी

बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभाग सरसावला

वनविभागाने लावला नायगावमध्ये पिंजरा

बिबट्या वनविभागाच्या जाळ्यात अडकणार की गुंगारा देणार ? तालुक्यातील जनतेचे लागले लक्ष

जामखेड तालुक्यातील नायगाव व परिसरातील गावांमध्ये मागील आठ दिवसांपासून बिबट्याची मोठी दहशत आहे. मंगळवारी जामखेड तालुक्यात प्रथमच बिबट्याचे वास्तव असल्याचे स्पष्ट होताच तालुक्यात मात्र मोठी खळबळ उडाली होती.गेल्या आठ दिवसांपासून नायगाव परिसरातील नागरिक बिबट्या दिसल्याचे वारंवार सांगत होते परंतु तो बिबट्याच असल्याचे स्पष्ट होत नव्हते. नायगाव गावात असणारे ऊसाचे मोठे क्षेत्र बिबट्याला लपण्यासाठी योग्य परिसर आहे.परंतु या भागात बिबट्या आलाच कसा हा मोठा प्रश्न जनतेला पडला आहे.परंतु मंगळवारी वनविभागाच्या अधिकार्यांनी नायगाव भागात पाहणी केली असता बिबट्याचे ठसे आढळून आले होते. त्यावरून तो बिबट्याच असल्याचे स्पष्ट झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

बुधवारी नायगावमध्ये वनपरीक्षेत्र अधिकारी गणेश छबीलवाड साहेब, वनपाल अनिल खराडे, वनरकक्षक किसन पवार, देवकर, ताहेर अली सय्यद, शामराव डोगरे,शहाजी नेहरकर, बबन महारनोर लहाने या वनविभागाच्या अधिकारी व कर्मचार्यांनी भेट देत बिबट्याला पकडण्यासाठी नायगाव येथील शेतकरी बाळु उगले याच्या वस्तीवरील ऊसाच्या शेतात पिंजरा लावला आहे.बिबट्या वनविभागाच्या जाळ्यात अलगद अडकणार का की गुंगारा देणार ? याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.बिबट्याला पकडण्यासाठी तातडीने पिंजरा लावल्याने नायगाव ग्रामस्थांना काहीसा दिलासा मिळाला आहे.बिबट्या लवकरात लवकर पकडला जावा अशी प्रार्थना नायगाव भागातुन केली जात आहे.

ब्युरो रिपोर्ट जामखेड टाईम्स

Buy Now on CodeCanyon