Surprise Me!

US Capitol मधील हिंसक आंदोलनाची घटना निंदनीय : अजित पवार

2021-01-08 106 Dailymotion

US Capitol मध्ये डोनाल्ड ट्रम्प समर्थकांनी केलेल्या हिंसक आंदोलनावर प्रतिक्रिया देताना, अमेरिकेतील घटना निंदनीय आहे असं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेत. "जगात अशाप्रकारचे हल्ले होणं निंदनीय बाब आहे. या घटनेचा धिक्कार केला पाहिजे. वेगवेगळी मतं विचार असू शकतात, सगळ्यांना एकाचेच विचार पटतील असे नाही. त्यालाच आपण लोकशाही म्हणतो. परंतु तिथे निवडणूक सुरू होती आणि निकाल लागला तेव्हापासूनच ऐकायला मिळत होतं की ट्रम्प यांना निकालच मान्य नाही. मतमोजणीला मानत नाही असं ते म्हणाले होते. तो त्यांचा अधिकार आहे. पण आपण त्याबाबत फार चर्चा करण्यापेक्षा आपल्या समस्यांना आणि प्रश्नांना प्राधान्य दिलं पाहिजे", असं अजित पवार म्हणाले. ते पिंपरी-चिंचवडमध्ये पोलिसांना स्मार्ट वॉच आणि स्पोर्ट्स सायकल वाटप, ग्रामरक्षक दलाच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते.

Buy Now on CodeCanyon