सुनिल सिंग आणि समीर सिंग हे रेसलिंग क्षेत्रताली नामांकित फायटर आहेत. त्यांच्या भारतीय टीमला WWE मध्ये 'द बॉलिवूड' बॉईज या नावानं ओळखलं जातं. ही मंडळी बॉलिवूडच्या गाण्यांवर थिरकत WWE रिंगमध्ये एण्ट्री करतात. लक्षवेधी बाब म्हणजे त्यांचं बॉलिवूड कनेक्शन केवळ एण्ट्री घेण्यापुरतं मर्यादित नाही. तर इतर भारतीय चाहत्यांप्रमाणे ते देखील बॉलिवूडपटांचे खुप मोठे चाहते आहेत. नुकतंच लोकसत्ता डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपलं बॉलिवूड प्रेम व्यक्त केलं.<br /><br />#WWE #BollywoodBoyz