Surprise Me!

गुमगाव परिसरातील शिवमडका येथे लांडग्यांच्या टोळीची दहशत

2021-03-01 1 Dailymotion

गुमगाव (जि. नागपूर) : हिंगणा तालुक्यातील गुमगाव नजीकच्या शिवमडका येथे लांडग्यांचा धुमाकूळ वाढला आहे. रात्री-अपरात्री शेळ्या लांडग्यांकडून फस्त केल्या जात असल्याने पशुपालक आणि ग्रामस्थांमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सहा ते सात महिन्यांपासून लांडग्यांनी शेतकऱ्यांच्या पाळीव शेळ्यांवर हल्ले करून फस्त करण्याचा सपाटाच लावला आहे. चार ते पाच लांडग्यांची टोळी गाव भागाच्या परिसरातून रात्री व दिवसादेखील फिरत असल्याचे प्रत्यक्षदर्शी शेतकरी सांगतात. वनविभागाने घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन लांडग्यांचा बंदोबस्त करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त पशुपालक करीत आहेत. (व्हिडिओ - रवींद्र कुंभारे)

Buy Now on CodeCanyon