Surprise Me!

गुमगाव ते लाडगाव रस्ता उठला बळीराजाच्या जीवावर

2021-03-19 558 Dailymotion

गुमगाव (जि. नागपूर) : हिंगणा तालुक्यातील गुमगाव ते लाडगाव रस्त्याचे बांधकाम आठ ते नऊ महिन्यांपासून थंडबस्त्यात गेल्याने दुचाकी, चारचाकी, बैलगाडींचे अपघात होत आहे. शिवाय वाहने नादुरुस्त होत असून गिट्टीयुक्त रस्त्यावरून चालतांना जनावरे जखमी होत आहे. तरी संबंधित बांधकाम विभाग मात्र बघ्यांची भूमिका घेत असल्याने हा मार्ग सध्या बळीराजाच्या जीवावर उठल्याचे दिसून येत आहे. रस्त्यावर गिट्टी वाट्टेल तशी पसरविण्यात आली आहे. त्यामुळे वाहन पंक्चर होणे, समोरून येणाऱ्या मोठ्या वाहनाला 'साईड' देतांना कित्येकदा वाहनचालक पडणे, गिट्टीयुक्त रस्त्यामुळे जनावरे जखमी होणे, वाहन नादुरुस्त होणे, शेतातील भाजीपाला, पिके घरी आणि बाजारात ने-आण करतांना तारेवरची कसरत करणे, मोठ्या वाहनांच्या टायरमधून मोठे मोठे गिट्टीयुक्त दगड उडून मजूर, जनावरे आणि पादचाऱ्यांना लागून जखमी होण्याच्या प्रकारात दिवसेंदिवस वाढ होत आहे. (व्हिडिओ : रविंद्र कुंभारे)

Buy Now on CodeCanyon