वेगवेगळे छंद जोपासणारे अनेक जण असतात..परंतु बऱ्याच जणांचे छंद शाळा संपली की त्याच्याबरोबरच संपतात. मोठेपणीही चिकाटीने छंद जोपासणारे आपल्यापैकी थोडेचजण. परंतु प्रतिसाद नेऊरगांवकर यांनी मात्र आपल्या स्टॅम्प कलेक्शनचा छंद नुसताच जोपासला नाही तर ते आता स्टम्पचे अभ्यासकदेखील आहेत. फिलाटेलिस्ट अशी त्यांची ओळख आहे.
