कापसाची उत्पादकता वाढवली तर कापसाची शेती नक्की परवडेल असा विश्वास नागपूर जिल्ह्यातल्या नरखेड तालुक्यातल्या अंबाळा पंचक्रोशीतल्या ५०० शेतकऱ्यांना वाटतोय. कृषी विभागाच्या मदतीनं या शेतकऱ्यांनी कापसाची उत्पादकता वाढवण्यासाठी सरी वरंब्यावर ठिबकच्या मदतीनं २८ क्विंटलपर्यंत मजल मारलीय.