नाशिक- येथील नेहरू वनौषधी उद्यानात फायबरचे प्राणी, वनस्पती, झाडांची शास्त्रोक्त माहिती, बाळगोपाळांना निसर्गाची माहिती होण्यासाठी रचलेले स्ट्रक्चर, सायकल ट्रॅक, मनोरंजन पार्क एवढ्यापुरते उद्यानाचे महत्त्व मर्यादित नाही. वनौषधी उद्यानात उभारलेली बोलकी झाडे वैशिष्ट्य ठरली. <br />लेझर शोच्या माध्यमातून बोलक्या झाडांची उभारलेल्या प्रतिकृतीतून निसर्ग वाचवाचा संदेश नाशिककरांना मिळणार आहे. दररोज सायंकाळी सात ते रात्री नऊच्या दरम्यान बोलक्या झाडांचा करिष्मा नाशिककरांना पाहायला मिळेल. लोकार्पण सोहळ्यानिमित्त सादर केलेला पहिल्याच शो बघितल्यानंतर प्रत्येकाच्याच तोंडून अद्भुत अन् अप्रतिम असे शब्द बाहेर पडले. <br />(छायाचित्रे - केशव मते)
