Surprise Me!

Navratri Festival 2019 : करवीर निवासिनी श्री अंबाबाईची आनंदलहरी रूपात पूजा

2021-04-28 7 Dailymotion

#SakalMedia #NavratriFestival2019 #KarveerNivasiniAmbabaiPuja #kolhapur #Puja
करवीर निवासिनी श्री अंबाबाईची आनंदलहरी रूपात पूजा
कोल्हापूर - नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी आज श्री अंबाबाईची आनंदलहरी रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली. मंदिरात सलग तिसऱ्या दिवशी देशभरातून भाविकांनी मोठी गर्दी केली असून गुरूवारी (ता. 3) श्री अंबाबाई त्र्यंबोली देवीच्या भेटीसाठी जाणार आहे.

आजच्या पूजेविषयी...
आदि शंकराचार्यानी रचलेले आनंदलहरी हे स्तोत्र सौंदर्यलहरींचाच एक भाग आहे. सौंदर्यलहरी हे नुसते स्तोत्र नसून त्यामधून त्रिपुरसुंदरीची अंतरंग आणि बहिरंग पूजाविधी सांगितली आहे. आदि शंकराचार्यांनी अंतरंग उपासनेमध्ये त्रिपुरसुंदरी म्हणजे साक्षात कुंडलिनी शक्ती स्वरूप सांगितली आहे. तीने उत्तम स्वर्णालंकार आणि सूर्यासारखे तेजस्वी मणी शरीरावर परिधान केलेले आहेत. तिने आपल्या हरणासारख्या डोळ्यांनी साक्षात शिवाला भुरळ पाडली आहे. जी साक्षात विद्युल्लतेसारखी सळसळती आणि तेजस्वी आहे. तिने पितांबर म्हणजेच पिवळी वस्त्रे परिधान केलेली आहेत. तिचे पैंजन तिचे सौंदर्य खुलवत आहेत. अशी ती सर्वमयी, कल्याणकारी, स्मितमुखी अपर्णा आनंदाचा, सुखाचा वर्षाव कर, अशी प्रार्थना देवीला या पूजेतून केली असल्याची माहिती श्रीपूजक पराग ठाणेकर, प्रसाद लाटकर, श्रीनिवास जोशी, पुरूषोत्तम ठाणेकर यांनी दिली.

Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔
Never miss an update do hit the

Find us here also
ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com
'सकाळ' फेसबुक : https://www.facebook.com/SakalNews/
'सकाळ' ट्विटर : https://twitter.com/SakalMediaNews
'सकाळ' इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/sakalmedia
Email ID: webeditor@esakal.com

Buy Now on CodeCanyon