जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत तिसरीत शिक्षण घेणारी... तिचा एक व्हिडिओ सोशल मीडीयात व्हायरल झाला. अवघ्या चोवीस तासात फेसबुकवर पन्नास हजार लाईक्स; दहा हजार शेअर्स; हजारो कॉमेंट्सचा पाऊस पडला. आज (बुधवारी) दिवसभरात तिच्या व्हिडिओला देश-विदेशातील मराठी प्रशासकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. <br /> श्रेया गोरक्षनाथ सजन (इयत्ता तिसरी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कडू वस्ती, सात्रळ, ता. राहुरी) असे या चिमुरडीचे नाव आहे. काल (मंगळवारी) सकाळी तिच्या वडिलांनी 'मराठी शाळा टिकल्या पाहिजेत.' या फेसबुक पेजवर सुबक वळणदार हस्ताक्षरात लिहिलेला एक वहीचा कागद अपलोड केला. त्यावर "माझ्या तिसरी इयत्तेतील मराठी शाळेत शिकणाऱ्या मुलीचे हस्ताक्षर..." असा उल्लेख केला. त्यावर "आठ वर्षाच्या चिमुरडीचे एवढे सुंदर हस्ताक्षर असूच शकत नाही." अशा काहींनी कॉमेंट्स टाकल्या.<br /><br />#Education #Handwriting #Writing #Creative #Ahmednagar #Sakal #SakalNews #ViralIndia #ViralNews #ViralVideos #MarathiNews #MarathiVideos
