Surprise Me!

महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतला कर्मचाऱ्याचा क्‍लास!

2021-04-28 84 Dailymotion

माझ्याकडेही जीन्स, टी शर्ट आहेत : तुकाराम मुंढे
एका कर्मचाऱ्याचा मोबाईल केला जप्त

नागपूर : महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज शिवजयंती सोहळ्यात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा चांगलाच क्‍लास घेतला. कार्यालयात जीन्स घालून येऊ नये, हे आयुक्तांनी सुरुवातीलाच सांगितले होते. तरीही आजच्या कार्यक्रमात एक कर्मचारी जीन्स घालुन आला. त्याला "माझ्याकडेही भरपूर जीन्स आणि टी शर्ट आहेत', असे सुनावत "आज सांगतो, यापुढे वॉर्नींग देणार नाही', असे त्या कर्मचाऱ्याला सुनावले. याच वेळी एका कर्मचाऱ्याचा मोबाईल फोन वाजला, तो लगेच मुंढेंनी जप्त केला आणि त्या कर्मचाऱ्याचे नाव नोंदवून घेण्याची सुचना दिली. त्याला. "मोबाईल फोन माझ्याकडेही आहे, अन तुमच्यापेक्षाही भारी आहे', असे सुनावले. एकंदरीतच शिस्तीच्या बाबतीत त्यांना सर्वांचा कडक क्‍लास घेतला.

#sakal #sakalnews #sakalmedia #viral #news #nagpur

Buy Now on CodeCanyon