भारतात पाऊल ठेवताच
सुटकेचा नि:श्वास टाकला

लातुरातील युवक
चीनहून भारतात सुखरूप परत

लातूर : ‘कोरोना’ने चीनमध्ये थैमान घातले आहे. त्यामुळे अनेक भारतीय तेथे अडकले आहेत. पण भारत सरकारच्या मदतीने त्यांची सुटका होऊ लागली आहे. यात लातूरमधील आशिष गुरमे या विद्यार्थ्याचाही समावेश आहे. तो तिथल्या हुबे राज्यातील क्शायनिंग शहरातील हुबे युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नोलॉजी या विद्यापीठात एमबीबीएसचे शिक्षण घेण्यासाठी गेला होता. तिथून परत आल्यानंतर त्याने 'सकाळ'शी संवाद साधला. भारतात पाऊल ठेवताच सुटकेचा नि:श्वास टाकला, अशी भावनाही व्यक्त केली.

(व्हिडिओ: सुशांत सांगवे)

#Sakal #SakalMedia #SakalNews #viral #news #coronavirus #coronavirusindia