धुळे : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव संपूर्ण जगात पसरल्याचे बघावयास मिळत आहे आणि हा प्रादुर्भाव जास्त वाढू नये. यासाठी केंद्र सरकार तसेच राज्य सरकार तर्फे वेगवेगळ्या उपाययोजना देखील राबविल्या जात आहेत. नागरिकांनी घराबाहेर पडताना चेहऱ्याला मास्क लावुनच बाहेर पडावे अशा सूचना आरोग्य विभागाकडून वारंवार देण्यात येत आहेत. पण नागरिकांनी आता देवांना देखील चक्क मास्क लावल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.<br />प्रत्येक संकटातून वाचविणाऱ्या संकटमोचक हनुमानाला मास्क लावून भाविकांनी बजरंगबलीला या आजारापासून सर्वांचे रक्षण करण्यासाठी व या संकटातून वाचविण्यासाठी साकडे घातले आहे. (व्हिडीओ - भूषण अहिरे, धुळे)<br /><br />#maharashtra #dhule #coronavirus #lord #hanuman #sakalviral #sakalnews #viralnews #viral #marathivideos #viralvideos #covid19
