या आदिवासी गोंड कुटुंबाला कोणी मदत करील काय?

औरंगाबाद : माळीवाडा येथे वीस वर्षांपासून पाल टाकून वास्तव्यास असलेल्या आदिवासी गोंड समाजाच्या जवळपास सत्तर कुटुंबांवर संचारबंदीमुळे उपासमारीची वेळ आली आहे. गायरान जमिनीवर गोणपाटाच्या झोपडीत ही कुटुंबं राहतात. पुरुष मंडळी कानातील मळ काढून देत, जडीबूटी विकून, तर महिला खारीक खोबरे विकून रोज छटाक आधपाव किराणा घेत उदरनिर्वाह करतात. त्यांच्यावर सध्या उपासमारीची वेळ आली आहे. समाजसेवी संस्था अथवा प्रशासनाचेही अजून तिकडे लक्ष गेलेले नाही.
(व्हिडीओ : किशोर पाटील, दौलताबाद)

#Sakal #SakalNews #viral #ViralNews #SakalMedia #news #lockdown #Lockdown21