उघड्यावरील कुटुंबाच्या मदतीसाठी सरसावले मदतीचे हात <br />तिवसा (जि. अमरावती) : संचारबंदीमुळे अनेकांची रोजगार बुडाली कोरोनाव्हायरस चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रशासनाने नागरिकांना घराबाहेर पडू नये असे आव्हान करत राज्यातील सर्व खाजगी कंपन्यांसह मोठे मॉल बंद करण्यात आले. त्यामुळे सामान्य जनतेला मोठी अडचण निर्माण झाली. त्याचबरोबर ज्या लोकांच्या घरच्या चुली रोजच्या मजुरीमुळे पेटायच्या अशा लोकांसमोर उपासमारीचा प्रश्न उभा ठाकला होता. अशाच काही कुटुंबावर या संचारबंदीमुळे उपासमारीची वेळ आल्याची बातमी सकाळने प्रकाशित केली होती. याच बातमीची दाखल घेत गणेशदास राठी छत्रालय समितीचे अध्यक्ष वसंत मालपाणी यांच्या मार्गदर्शनात विनोद पटेल व आशिष पंचारिया यांनी मदत केली.<br />(व्हिडिओ : प्रशिक मकेश्वर)<br /><br />#HelpingHands #Amravati #Vidarbha #SakalNews #MarathiNews #Sakal #SakalMedia