Surprise Me!

सामाजिक तेढ निर्माण करू नका : पोलिस अधीक्षक चैतन्य एस.

2021-04-28 416 Dailymotion

जालना : सोशल मीडियावर सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट व्हायरल केल्या जात आहेत. आशा पोस्ट व्हायरल करणाऱ्यादोन जणांना अटक करून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची।माहिती पोलिस अधीक्षक चैतन्य एस यांनी एका व्हिडीओ द्वारे दिली आहे. आज सर्वांचा शत्रू कोरोना विषाणू आहे, दुसरा माणूस नाही. या कोरोना विषाणूशी लढण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन, आरोग्य यंत्रणा चोवीस तास तुमच्या साठी काम करत आहे. संपूर्ण पोलिस दल तुमच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर उभा आहे. त्यामुळे सामाजिक तेढ निर्माण होईल असे कृत्य कोणी करू नये, जर तसे केले तर त्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात येईल. पोलिस प्रशासनाच्या सायबर सेल मार्फम व्हाट्सअँप, फेसबुक आदी सोशल मीडियावर लक्ष ठरवले जात आहे, असे पोलिस अधीक्षक चैतन्य एस यांनी म्हटले आहे.<br />.<br />.<br />#jalna #police #appeal #lockdown #socialmedia #posts #news #coronavirus #coronainmaharashtra #coronavirusoutbreak #coronaupdates #sakal #sakalnews #viral #viralnews #video #videos #viralvideo #viralvideos

Buy Now on CodeCanyon