Surprise Me!

मॉरिशसची पूर्वशा संचारबंदीनंतर वसतिगृहातच अडकली!

2021-04-28 191 Dailymotion

महावीर महाविद्यालयाच्या महिला वसतिगृहात १०० मुली. कोरोनाच्या संचारबंदीने ९९ मुली आपापल्या घरी परतल्या. मॉरिशसची पूर्वशा सांतराम सखू मात्र वसतिगृहात अडकली. तिची काळजी घेण्यात महाविद्यालयीन प्रशासन डोळ्यात तेल घालून झटत आहे. प्राचार्यांकडून रोज तिच्या प्रकृतीची चौकशी सुरू आहे. कॅन्टीन चालक राजेंद्र पाटोळे तिला जेवण बनवून देत आहेत. मैत्रिण हेतल भानुशाली हीसुद्धा घरातून जेवणाच्या डब्यासह खास कोल्हापुरी पदार्थ तिला खायला देत आहे. रेक्टर स्वप्नाली मोरे वसतिगृहात तिला आधार देण्यासाठी थांबून आहेत. महाविद्यालयच 'केअर टेकर' बनल्याने पूर्वशा पुस्तक वाचनात दंग आहे.<br /><br />बातमीदार : संदीप खांडेकर<br /><br />व्हिडिओ : मोहन मेस्त्री

Buy Now on CodeCanyon