"कोविड 19'च्या रूपानं समस्त मानव जातीवर महामारीचं संकट आलं आहे. त्यामुळे सध्या आपणा सगळ्यांना येत्या 3 मेपर्यंत लॉकडाउनमध्ये राहायचं आहे. आपण या काळात घरात का बसायचं, याचं कारण असे, की हा कोरोना विषाणू फार झपाट्याने माणसातून माणसात पसरतोय. हा अतिशय संसर्गजन्य जिवाणू आहे. सरफेसवरून, माणसाच्या थुंकीतून, आपण स्पर्श केलेल्या जागेतून, स्पर्श केलेल्या वस्तूतून हा विषाणू फार झपाट्याने पसरतोय. यामुळेच आपण आज लॉकडाउनमध्ये आहोत. या लॉकडाउनमध्ये आपल्याला अनुशासन पाळायचं आहे... सांगताहेत सर्जन व कॅन्सरतज्ज्ञ डॉ. शिरीष कुमठेकर.<br /><br />#Sakal #SakalNews #viral #ViralNews #MarathiNews #SakalMedia #news #Solapur #Maharashtra
