Surprise Me!

नियम पाळा, कोरोना टाळा’ सामाजिक लघुपट

2021-04-28 626 Dailymotion

औरंगाबाद ः कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाउन आहे. अशावेळी घरात राहून काय करायचे असा प्रश्न अनेकांना पडतो. परंतु, कोरोनाबाबत सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी आशिष निनगुरकर यांनी घरात राहूनच कोरोनाविषयक सामाजिक संदेश देणारा आणि जनजागृती करणारा ‘नियम’ हा लघुपट तयार केला आहे. <br />कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सरकारने या लॉकडाउनच्या काळात अनेक नियम घालून दिले आहेत; पण अनेक जणांकडून या नियमांचे उल्लंघन होताना दिसते. जर नियम पाळले नाहीत तर काय होऊ शकते? हे या लघुपटाच्या माध्यमातून दाखवण्यात आले आहे. यासाठी आशिष यांनी मोबाईल हा कॅमेरा, कुटुंब हेच कलाकार आणि घर हेच 'लोकेशन' वापरून,'नियम' हा लघुपट निर्मित केला आहे.<br /> <br />#Coronavirus #Covid19 #MaharashtraNews #MarathwadaNews #SakalNews #MarathiNews #AurangabadNews #Sakal #viral #ViralNews #SakalMedia #news

Buy Now on CodeCanyon