अकोला : राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर आपल्या जादुई खेळाने यशाचे शिखर पदक्रांत करणाऱ्या अकोला हाॅकी असोसिएशनचे दोनशेहून अधिक खेळाडू सध्या टाळेबंदीमध्ये घराच्या टेरीसवरच हाॅकीचा सराव करीत आहेत. विशेष म्हणजे या लाॅकडाउन काळात हाॅकीचे बेसिक स्कील शिकण्यास मदत होत असल्याने हाॅकीपटूंसाठी हा लाॅकडाउन फायदेशीर ठरला असल्याचे बोलले जात आहे.<br />#Hokey #Sports #Lockdown #Akola #Vidharbha #EsakalNews #SakalNews #MarathiNews #Viral #SportsNews
