Surprise Me!

पश्चिम घाटात वसलेल्या शाहूवाडी तालुक्यातील डोंगउतारावर देखील या निसर्ग वादळाचे तडाखे पाहायला मिळाले.

2021-04-28 348 Dailymotion

निसर्ग वादळाने आज पश्चिम किनाऱ्याला धडक दिली. त्यामुळे मुंबई, कोकणसह कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर पश्चिम घाटात वसलेल्या शाहूवाडी तालुक्यातील डोंगउतारावर देखील या निसर्ग वादळाचे तडाखे पाहायला मिळाले. डोंगर वाटेवर सोसाट्याच्या वारा आणि पाऊस यामुळे रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली. मात्र शेतकऱ्यांचं नियमित कामकाज मात्र सुरूच असल्याचे पाहायला मिळाले. वारा आणि पावसापासून छत्री आणि प्लास्टिक खोप घेवून शेतकरी जनावरांना शेतात चरण्यासाठी घेवून गेल्याचे तसेच शेत कामात गुंतलेले पाहायला मिळाले. कोरोना असो की निसर्ग वादळ शेतकऱ्यांचं शेतात कष्ट उपसनं मात्र थांबलेले नाही....<br /><br />रिपोर्टर - सदानंद पाटील

Buy Now on CodeCanyon