Surprise Me!

गर्भवती निराधार महिलेला मिळेल का आधार? | Sakal Media |

2021-04-28 2,423 Dailymotion

पिंपरी : ती आठ महिन्यांची गर्भवती, उराशी दीड वर्षाचं बाळ, आणि सोबत आठ वर्षांचा मुलगा अन्‌ पंधरा वर्षांची मुलगी अशांना घेऊन ती फिरतेय दारोदारी. लॉकडाउनमुळे गेल्या दीड महिन्यापासून महापालिकेच्या केंद्रातच निवारा आणि आधार मिळाला. हळूहळू एकेक आपापल्या घरी परतले. पण तिच्या वाट्याला निवारा केंद्रच उरला. तिची अवघड स्थिती पाहता, कधी काय होईल, याचा काही नेम नाही. तिला ना पती, ना भाऊ स्वीकारत. मग तीच काय या काळजीने प्रशासन चिंतातूर झाले आहे. आता तिला गरज आहे आधार अन्‌ निवाऱ्याची. ही कर्मकहाणी आहे रेखा गोसावी यांची. (व्हिडिओ : संतोष हांडे)<br />#SakalMedia #SakalVideo #MarathiNews #PregnantWomen #Childrens #PimpriChinchwad #PCMC #Pune #LockDown

Buy Now on CodeCanyon