Surprise Me!

सोलापुरात कंत्राटी आरोग्यसेविकांची अवहेलना

2021-04-28 1,118 Dailymotion

कोरोनाच्या संकटाला न घाबरता सोलापूर शहर कोरोनामुक्त करण्यासाठी काही घटक जिवाची पर्वा न करता काम करत आहेत. कोरोनाच्या संकटासोबतच फिल्डवर जाऊन लढणाऱ्यांमध्ये असलेल्या कंत्राटी आरोग्यसेविकांची अवहेलना सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून होत आहे. कोरोनाचे संकट आल्यापासून या कंत्राटी आरोग्यसेविकांना ना सुटी मिळाली, ना रजा मिळाली. सततची ड्यूटी, कामाचा प्रचंड ताण यामुळे सर्दी, ताप, खोकला यासह आजारी पडलेले कंत्राटी आरोग्यसेविका गोळ्या, औषधे खाऊन कोरोनाचे युद्ध लढत आहेत. या कंत्राटी आरोग्यसेविकांना सोलापूर महापालिकेने वाऱ्यावरच सोडले की काय, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.<br /><br /><br />#sakalsolapur #treding #covid19 #sakalmedia #viral

Buy Now on CodeCanyon