Surprise Me!

शाळा सुरू करण्याबाबत माजी शिक्षण सभापतींनी दिला सल्ला

2021-04-28 1,450 Dailymotion

नागपूर : वर्षभरात दोनशे दिवस शाळा असते. त्यामुळे मार्चपासून शाळा बंद ठेवल्यावर सप्टेंबर महिन्यात शाळा सुरू केल्यास, सरकारला उपाययोजना करण्यास बराच कालावधी मिळतो. या कालावधीत शाळा सॅनिटाईझ करणे, त्यात सोयी-सुविधा देणे आणि आरोग्यविषयक माहिती देणे अपेक्षित आहे. मात्र, आताच शाळा सुरू केल्यास सोशल डिस्टंन्सिग आणि आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर येणार आहे. कारण, प्रत्येक शाळेत विद्यार्थी संख्या बरीच मोठी आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यता आहे. तेव्हा आता विद्यार्थ्यांना केवळ घरीच कसा काय अभ्यास करता येईल, याबाबत शिक्षकांनी सांगावे जेणे करून त्यांच्यात शिक्षणाची गोडी कायम राहील, असे मत नागपूर महानगरपालिकेचे माजी शिक्षण सभापती गोपाल बोहरे यांनी व्यक्त केले.<br /><br />#Education #School #Opening #GopalBohare #Plan #NoLoss #Vidarbha #SakalNews #MarathiNews #ESakalNews #Viral

Buy Now on CodeCanyon