Surprise Me!

सोलापुरात वसंत विहार येथील योग दिन

2021-04-28 412 Dailymotion

सोलापूर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सोलापूर पतंजली योग समितीच्यावतीने रविवारी सकाळी वसंत विहार येथील पंधे उद्यानात जागतिक योगदिन साजरा झाला. नियमित योग आणि प्राणायाम केल्यास मानसिक आणि शारीरिक स्वास्थ लाभते. योगामुळे मन आणि शरीर सुदृढ होण्यास मदत होते. नियमित योग केल्याने तणाव दूर होण्याबरोबरच शरीरातील व्याधींपासून सुटका मिळते. मानवाच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकासाबरोबर आध्यात्मिक उन्नतीची परिसीमा योग साधनेतून साधता येते. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये संयुक्त राष्ट्राच्या महासभेत 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला आणि डिसेंबरमध्ये त्याला मान्यता मिळाली. 21 जून 2015 रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभरात उत्साहाने साजरा करण्यात येतो.<br /><br />#treding #sakalnews #marathinews #sakalmedia #viral #solapursakal

Buy Now on CodeCanyon