Surprise Me!

विदर्भ व नागपुरातील मंगळवारच्या (ता. 23) महत्त्वाच्या घडामोडी

2021-04-28 2,368 Dailymotion

नागपूर : महापालिका आयुक्त तुकराम मुंढे सभेला येणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना आज त्यांनी उपस्थित राहून नगरसेवकांसह सर्वांनाच धक्का दिला आहे. दोनच दिवसांपूर्वी झालेल्या सभेतून मुंढे निघून गेले होते. त्यानंतर त्यांच्याबाबत अनेक चर्चांना उधाण आले होते. मुंढे सभेत आल्याने ते काय भूमिका घेतात, सत्ताधारी आणि विरोधकांच्या प्रश्‍नांना काय उत्तरे देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नागपूर : सक्‍करदरा परिसरात वर्चस्वाच्या वादातून चार कुख्यात गुंडांनी वस्तीतील दादागिरी आणि दबदबा कायम ठेवण्यासाठी एका युवकाचा "फिल्मी स्टाईल'ने तलवारीने भोसकून खून केला. ही थरारक घटना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास सोमवारी क्‍वॉटर्स परिसरात घडली. गौरव विनोद खडतकर (वय 28, रा. सोमवारी क्‍वॉटर्स) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.

नागपूर : लॉकडाउनच्या काळात अनेकांनी ऑनलाइन सरासरी बिल भरले. त्यांनाही चार महिन्यांचे बिल पाठविण्यात आले. आता आधी बिल भरा नंतर दुरुस्ती करू असे सांगण्यात येत आहेत.

यवतमाळ : जिल्ह्यातील दारव्हा तालुक्‍यात असलेल्या महागाव कसबा येथील प्रकाश दुधे या शेतकऱ्याने परिस्थितीवर मात करत चक्क शेतात पिकविलेल्या हळदीची पावडर विकून आयुष्यात ' प्रकाशवाट ' निर्माण केली आहे.

#Nagpur #NagpurNews #Vidarbha #VidarbhaNews #News #SakalNews #Sakal #MarathiNews #Amravati #Yavatmal #Bhandara #Gondia #Chandrapur #Gadchiroli #Wardha

Buy Now on CodeCanyon