सोलापूर : कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तींची माहिती व पडताळणी दोन दिवसांपासून केली जात आहे. ज्या रुग्णालयात कोरोनबाधिताचा मृत्यू झाला आहे त्याच रुग्णालयाने शासनाच्या वेबसाईटवर माहिती अपलोड करणे बंधनकारक असताना सोलापुरातील रुग्णालयांनी ही माहिती अपलोड केली नाही. ही माहिती संकलित करण्यासाठी महापालिकेच्या ज्या कर्मचाऱ्यावर जबाबदारी सोपविण्यात आली होती त्याने जबाबदारीने काम केले नसल्यामुळे त्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. हॉस्पिटलची माहिती संकलित करण्यासाठी महापालिकेच्या ज्या कर्मचाऱ्याला प्रशिक्षण दिले होते ते कर्मचारीच आजारी पडले. महापालिकेच्या कोरोना कंट्रोल रूममध्ये काम करणारा व्यक्ती कोरोना बाधित झाला. दरम्यानच्या काळात महापालिकेचे आरोग्य अधिकारी बदलले या सर्व कारणांमुळे ही माहिती भरता आली नसल्याची कबुली महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी या पत्रकार परिषदेत दिली. <br />सविस्तर बातमी वाचण्यासाठी https://www.esakal.com/paschim-maharashtra-news/solapur/mystic-count-deaths-due-corona-disease-solapur-municipal या लिंकवर क्लिक करा...
