सोलापूरचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून अनावधानाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणीस यांचा उल्लेख झाला आहे. नाभिक समाजाच्या प्रश्नावर बोलताना पालकमंत्री भरणे यांनी मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांचा उल्लेख केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळात आपण असल्याची जाणीव त्यांना क्षणात झाल्याने ही चूक त्यांनी सावरुन घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असा उल्लेख करून स्वतःला सावरून घेतले. कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी सोलापूरच्या दौऱ्यावर आल्यानंतर हा प्रसंग घडला.<br /><br />#treding #sakalnews #marathinews #viral #politics
