जळगाव : शेतकऱ्यांशी निगडित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जामनेरमध्ये भाजपच्यावतीने आंदोलन करण्यात आले. महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी उदासीन असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. शेतकऱ्यांचे प्रश्न त्वरित सोडवले नाहीत तर भाजपकडून यापुढे तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही आंदोलकांनी दिला.
