चंद्रपूर : पश्चिम बंगालमध्ये प्रामुख्याने धानाच्या बांध्यात मोठ्या प्रमाणावर मत्स्यपालन केले जाते. असाच प्रयोग आता चंद्रपूर जिल्ह्यातील नंदगुर या गावातील शेतकऱ्याने शेतातच केला आहे. तीन एकरापैकी एका एकरात मागील वर्षी त्याने धानाचे पीक घेतले. धानपीक घेतल्या जागेवर चर खोदण्यात आले. यात चार प्रकारचे मत्स्यजीरे टाकण्यात आले. आता या चरातील मासे मोठे झाले. यातून त्याला जवळपास दीड लाखाचे उत्पन्न अपेक्षित आहे. कृषी विभागाने प्रायोगिक तत्त्वावर हा प्रयोग नंदगुर या गावातील शेतकऱ्याच्या शेतात राबविला. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले. त्यामुळे अन्य गावांतही असेच प्रयोग करण्याचा विचार कृषी विभागाचा आहे. (व्हिडिओ : श्रीकांत पेशट्टीवार)