कोल्हापूर शहरात पुकारलेल्या जनता कर्फ्युला विविध व्यापारी संघटनांचा विरोध वाढत आहे. काल राजारापुरी व्यापारी असोसिएशन, कॉमन मॅन संघटनेसह आणखी काही संघटनांनी विरोध केल्यानंतर आज महाद्वार रोड येथील रेडिमेड, क्लॉथ ऍण्ड गारमेंटस डीलर असोसिएशननेही दुकाने बंद ठेवणार नसल्याचे जाहीर केले आहे.

कोल्हापूर सराफ व्यापारी संघाने जर जनता कर्फ्यु शंभर टक्के बंद असेल तर त्याला आमचा पाठिंबा असले असे जाहीर केले आहे.

जनता कर्फ्युमध्ये सहभागी व्हा असे आवाहन चेंबर ऑफ कॉमर्सने केले आहे. याला शिवाजी पेठेने पाठिंबा दिला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी रात्री बारा ते गुरुवारी रात्री बारापर्यंत नवे 873 कोरोनाबाधित रुग्ण आढळले.

जिल्ह्यात रात्री बारानंतर जोरदार पावसाने हजेरी लावली.

बातमीदार : सुनिल पाटील

व्हिडीओ : मोहन मेस्त्री