गेल्या काही दिवसात आता रंकाळयातील तांबट कमानीचा परिसर शहरवासियांना साद घालू लागला आहे. दगडी कट्टयावर बसून रंकाळ्याचे रम्य रूप पाहणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. छायाचित्रकार व चित्रकारांसाठी तर हा परिसर हक्काचे डेस्टीनेशन ठरू लागला आहे. रंकाळ्यावरील ठरलेल्या ठिकाणीच गर्दी करण्यापेक्षा तांबट कमान परिसरातूनही रंकाळ्याच्या रम्य रूपाचा आनंद घेता येतो. या परिसरात असणारी दोन झाडे आणि त्याभोवतीचे कट्टे तर तरूणाईसाठी सेल्फी पॉईंट ठरू लागले आहेत.<br /><br />व्हिडीओ - बी.डी.चेचर