चारपाच महिने शहरातील बागा आणि बालोद्याने कुलूपबंद आहेत, नागरीक घरात आहेत. "कामाशिवाय बाहेर पडू नका ' या नियमाने मुलांचे घराबाहेर पडणे बंद झाले आहे. घरात टीव्ही आणि ऑनलाईन शाळा सुरू झाल्याने मोबाईल या दोनच विश्वात रमलेल्या लहान मुलांची पावले आता घरात थांबेनाशी झालीत. त्यामुळे अनेक पालकांनी बंद असलेल्या बागांमध्ये आडमार्गाने प्रवेश मिळवून मुलांना खेळण्यासाठी जागा करुन दिली आहे. रंकाळा चौपाटीच्या खेळण्यांवर मुलांचा किलबिलाट दिसत असले तरी कोरोनाचा संसर्ग वाढता असल्याने पालकांनीच या खेळांवर काहीसे बंधन घालणे गरजचे आहे. <br /><br />व्हिडीओ - मोहन मेस्त्री
