Surprise Me!

आज काय विशेष: राज्यपालांनी घटनेची चौकट ओलांडली का? | Sakal Media | Sakal | Politics | Maharashtra |

2021-04-28 1 Dailymotion

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून 'मंदिरं का उघडली जात नाहीयेत,' असा सवाल केला आहे. तसेच Have you suddenly turned 'Secular' yourselves, the term you hated? तुम्ही सेक्यूलर बनला आहात का, ज्या सेक्यूलर शब्दाचा तुम्ही द्वेष करत होतात? <br />घटनात्मक पदावर बसलेल्या एका राज्याच्या राज्यपालाने घटनात्मक पदाची शपथ घेतलेल्या मुख्यमंत्र्यांना हा प्रश्न विचारला आहे, ज्या दोघांचेही काम घटनेचे पालन करणे हे आहे. मुख्यमंत्री जर कुठे घटनेचे अवमूल्यन करत असतील... ती डावलत असतील... तर त्यासंदर्भात पालक म्हणून ज्या व्यक्तीची नेमणूक केली जाते, तीच व्यक्ती आक्षेपार्ह वाटावे अशा स्वरात म्हणते की... आपण आता सेक्यूलर झालात की काय...? आणि आपल्याला हिंदुत्वाचा विसर पडला की काय...? याच मुद्द्यावर आज काय विशेषमध्ये राज्यपालांनी घटनेची चौकट ओलांडली का? हे पाहणार आहोत.<br />#politics #maharastra #sakal #sakalmedia #CMO #Uddhavthakare<br />Video by - Prajwal Katake

Buy Now on CodeCanyon