लॉकडॉऊन काळातील घरगुती वीज बिले माफ करावीत, या मागणीसाठी सर्वपक्षीय कृती समितीतर्फे महावितरणच्या ताराबाई पार्कातील मुख्य कार्यालयाला आज सकाळी साडे नऊ वाजता ताला ठोको आंदोलन करण्यात आले. प्रवेशद्वाराला ताला ठोकताना पोलिस यंत्रणा व कार्यकर्ते यांच्यात झटापट झाली. प्रवेशद्वाराला ताला ठोकून आंदोलनाला सुरुवात केली. यावेळी वीज बिले भरणार नाही, वीज बिले माफ झाली पाहिजेत, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.<br /><br />बातमीदार - संदीर खांडेकर <br />व्हिडीओ - मोहन मेस्त्री