Surprise Me!

मराठा समाज मागास असल्याचं पुन्हा सिद्ध करा - चंद्रकांत पाटील

2021-05-06 1,575 Dailymotion

सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारने पारित केलेला मराठा आरक्षणासंदर्भातला कायदा रद्द ठरवल्यानंतर राज्य सरकार बॅकफूटवर गेल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यातच राज्यात मराठा आरक्षणाचा रद्द झालेला कायदा आणि पुढची पावलं या मुद्द्यांवरून राज्यात सत्ताधारी महाविकासआघाडी आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. गुरुवारी संध्याकाळी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केल्यानंतर आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अशोक चव्हाण यांना प्रत्युत्तर दिलं आहे<br /><br />#ChandrakantPatil #AshokChavan #MarathaReservation

Buy Now on CodeCanyon