इंदापूरचे राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रेय भरणे आणि कॉंग्रेसचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील या दोघांतील शाब्दिक युद्ध चांगलेच पेटले आहे. शेतकऱ्यांशी बैठकीत बोलताना भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांच्याविषयी शिवराळ भाषा आणि शिवीगाळ केली. त्याची "क्लिप' व्हायरल झाली. त्यामुळे या वादात भर पडली. भरणे यांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर देण्याचा इशारा पाटील यांनी दिला आहे.