Surprise Me!

पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच - संजय राऊत

2021-06-12 0 Dailymotion

देशात निर्माण झालेल्या आर्थिक आणि राजकीय लाटेत अनेक प्रादेशिक पक्ष टिकून राहू शकले नाहीत. महाराष्ट्रात शिवसेनेने आपली प्रतिष्ठा कायम राखली असून 2019 च्या निवडणुकीनंतर शिवसेनेचाच मुख्यमंत्री असेल असा ठाम विश्वास शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी व्यक्त केला. 2019 मधल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सगळे पक्ष आत्तापासूनच मोर्चेबांधणीच्या तयारीला लागले आहेत. शिवसेनाही राज्यात 'भगवा' फडकविण्यासाठी जय्यत तयारीला लागली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व पक्षातील इतर पदाधिकाऱ्यांनी राजकारणातील आपल्या चाली खेळायला सुरवात केली आहे. या पार्श्‍वभूमीवर 'सरकारनामा' सोबत शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी दिलखुलास चर्चा केली.

Buy Now on CodeCanyon