नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील शंभर शेतकरी कैद्यांना कर्जमाफी मंजूर झाली आहे. यातील 54 कैद्यांना कर्जमाफी मिळाली तर उर्वरित 46 कैद्यांना नातेवाईकांनी तांत्रिक पूर्तता केल्यावर कर्जमाफी मिळेल. हे सगळे घडले ते कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या अभिमन जिभाऊ बिरारी या अल्पशिक्षीत कैद्यामुळे. त्याच्या एका पत्राला प्रशासनाचा प्रतिसाद मिळाला अन् हा चमत्कार घडला.
