मुंबई : अजित पवार यांनी सारथीच्या प्रश्नावर आयोजित बैठकीत खासदार संभाजीराजेंना बोलावलं होतं. मात्र, बैठकीत संभाजीराजे यांना खाली बसवल्याचा मुद्दा उपस्थित करत गोंधळ घातला. जाणून बुजून छत्रपती संभाजीराजेंचा अपमान केल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी केला. संभाजीराजे यांनी आवाहन करुनही त्यांच्या समर्थकांनी गोंधळ घातला. अजित पवार यांनी संभाजीराजेंना वरती येण्याचा आग्रह केला. परंतु संभाजी राजे तिसऱ्या ओळीत बसले. समाजासाठी आपण मान अपमान न मानता बैठक करु. निर्णय महत्वाचा आहे. सारथी महत्वाची आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं.<br />#sarkarnama #Bulletin #Maharastra<br />सरकारनामा मॅानिंग बुलेटिन | राजकीय घडामोडी | महाराष्ट्र | पॅालिटिक्स | राजकारण
