धुळ्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांना भेटण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याने विद्यार्थी संघटना आक्रमक झाक्या आहेत.या मारहाणीचा निषेध करण्यासाठी आज जालन्यातील गांधीचमन चौकात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी मंत्री अब्दुल सत्तार यांचा पुतळा जाळला.आंदोलना दरम्यान विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी करून मारहाण करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. (व्हिडिओ - लक्ष्मण सोळुंके)
