मुंबई : सुशांतसिंह राजपूत प्रकरणाशी जोडला गेलेला संदीपसिंह व भारतीय जनता पक्ष यांच्यातील घनिष्ट संबंध आता उघड होत आहेत. या संदीपसिंहने भाजपा कार्यालयाशी तब्बल ५३ वेळा फोन केल्याची माहिती मिळत आहे. ती खरी असल्यास भाजपा कार्यालयातील ‘तो’ बॉस कोण आणि भाजपाची संदीपसिंहशी एवढी जवळीक कशी? या सर्व प्रश्नांची उत्तरे जनतेला मिळाली पाहिजेत, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.# SandeepSingh #SachinSawant #NarendraModi # SushantSinghRajput #RiyaChakraborty
