नागपूर : राजकीय नेत्याच्या स्वागताला किंवा निरोपाला गर्दी होणे स्वाभाविक आहे. पण शासकीय अधिकाऱ्याच्या निरोपाला नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने एकत्र येत मोठी गर्दी करून त्यांना निरोप देणे, अशी घटना क्वचितच घडते. आज नागपुरात असे घडले. धडाकेबाज, कठोर, शिस्तप्रिय, कायद्यांचे काटेकोर पालन करणारे अधिकारी तुकाराम मुंढे यांनी आज नागपूरचा निरोप घेतला. #Sarkarnama #सरकारनामा #MaharashtraNews #MarathiNews #MarathiPoliticalNews