गेल्या चोवीस तासात मुंबईला पावसाने झोडपून काढले आहे. ठिकठिकाणी पाणी साचले आहे. अजूनही तुफान पाऊस सुरु आहे. प्रशासनाने सर्व खासगी व सरकारी कार्यालयांना सुटी जाहीर केली आहे. काल पासून मुंबई, ठाणे, पालघर यासह राज्यात मुसळधार पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. <br /><br />या मुसळधार पावसामुळे मुंबई, ठाणे, पालघर परिसरात पाणी तुडुंब भरत असल्याने नागरिकांनी सतर्क राहून आपल्या घरात राहावे, असे आवाहन मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. या संपूर्ण परिस्थितीवर मात करण्यासाठी एनडीआरएफच्या पाच तुकड्या तयार करण्यात आल्या असून आपत्ती व्यवस्थापन विभाग लक्ष ठेऊन आहे, असेही त्यांनी सांगितले आहे.