Surprise Me!

आठवलेंना कोणीही गांभीर्याने घेत नाही: शरद पवार

2021-06-12 0 Dailymotion

पंढरपूरचे माजी आमदार सुधाकरपंत परिचारक, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष राजूबापू पाटील आणि प्रसिद्ध कीर्तनकार रामदास महाराज जाधव यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार मंगळवारी (ता. 29 सप्टेंबर) पंढरपूर दौऱ्यावर होते. त्या वेळी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी विविध मुद्यांवर मते व्यक्त केली. या वेळी त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह भाजपवर टीका केली. आठवले यांच्या पक्षाचा एकही आमदार, खासदार जनतेतून निवडून आलेला नाही. ते बोलत असतात, मार्गदर्शन करत असतात. त्यांची सभागृहात आणि बाहेरही कोणी गांभीर्याने नोंद घेत नाहीत, अशा शब्दांत त्यांनी आठवले यांच्या "एनडीए'त येण्याच्या आवाहनाची खिल्ली उडवली.<br /><br /><br />#Sarkarnama #SarkarnamaNews #viral #viralnews #politics #Maharashtra #MaharashtraNews #politicalnews

Buy Now on CodeCanyon