महाभारतात कौरव शिखंडीच्या मागून लढाई करत होते. भाजपचे नेते किरीट सोमय्या शिखंडी आहेत आणि आरोपांवर आरोप करत आहेत. फ्रॉड ला समानार्थी शब्द म्हणजे किरीट सोमय्या. वारंवार तक्रारी करायच्या , लोकांना डिस्टर्ब करायचंएवढंच त्यांचं काम आहे, अशी टीका मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली आहे. अन्वय नाईक प्रकरणात सोमय्यांनी शिवसेनेला लक्ष्य केल्यानंतर आता शिवसेनेचे नेते किरीट सोमय्यांवर सडकून टीका करत आहेत.